बायकोची डायरी वाचली अन् धक्का बसला; लग्नानंतर 12 दिवसांतच नवरदेवाची आत्महत्या

मुलगा २०२४ मध्ये तलाठी म्हणून रूजू झाला. त्याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील एका कार्यालयात पार पडला होता.

Ambejogai

बायकोची डायरी वाचली अन् धक्का बसला; लग्नानंतर 12 दिवसांतच नवरदेवाची आत्महत्या

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed) लग्नानंतर अवघ्या बाराव्या दिवशीच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या गणेश दत्तू कोळी (वय २६) या तलाठी पतीने कौटुंबिक वादातून अंबाजोगाई येथे गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली होती. पत्नीने पतीला स्वीकारण्यास दिलेला नकार, या धक्क्यातूनच पतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी मृत तलाठी तरूणाच्या आईने दिलेल्या जबाबावरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा (ता. औसा) येथील अंगणवाडीसेविका सुनंदा दत्तू कोळी यांचा मुलगा गणेश दत्तू कोळी हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १४ संभाजीनगर येथे पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. नोकरीत असतानाच गणेशने चंद्रपूर येथे तलाठी पदाची परीक्षा दिली आणि २०२४ मध्ये तो तलाठी म्हणून रूजू झाला. त्याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील एका कार्यालयात पार पडला होता. पत्नीही शासकीय नोकरी करत आहे. ४ जून रोजी अंबाजोगाई ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Exit mobile version