Download App

अमित शाहांच्या उपस्थितीत रणनीती ठरली! भाजप छत्रपती संभाजीनगरची जागा लढणवणार?

Amit Shah : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)राजकीय समीकरणं आता बिघण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तसा तर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच बालेकिल्ल्याला भाजपकडून (BJP)जोरदार धक्का देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागी आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

नांदेडच्या खासदारांची पहिली विकेट? डॉ. मीनल पाटील-खतगावकरांनी घेतली अमित शाहंची भेट

भाजपचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एवढंच नाही तर महायुतीच्या (Mahayuti)जास्तीत जास्त उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उभे करुन त्यांना निवडून आणण्याचा निर्धारही सोमवारी मध्यरात्री झालेल्या या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाची चांगलीच अडचण झाली आहे.

Maidan: अजय देवगणचा ‘मैदान’ एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शांहासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि विजया रहाटकर या देखील उपस्थित होत्या.

या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभेची जागा भाजपच लढवणार असं निश्चित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्या ज्या भागांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या बैठका होणार आहेत, त्या त्या भागात भाजपचेच उमेदवार द्यावेत, असाही निर्णय झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील भाजपच्या जागा निवडूण आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या तीनही विभागातील उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवाचं राण करावं लागणार आहे.

मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील भाजपची सर्वस्वी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचीच असणार आहे. त्याचबरोबर भाजपसोबत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देखील नाराज न करता, सर्व समीकरणं ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जुळवून आणावी लागणार आहेत. त्यामुळे या तिनही विभागातील जागावाटपाचा तिढा सोडवणं हा सर्वात मोठा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.

follow us

वेब स्टोरीज