नांदेडच्या खासदारांची पहिली विकेट? डॉ. मीनल पाटील-खतगावकरांनी घेतली अमित शाहंची भेट
नांदेड : माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डाॅ. मीनल पाटील-खतगावकर (Dr. Meenal Patil-Khatgaonkar) यांनी आज (5 फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. शाह आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मीनल पाटील-खतगावकर आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, या भेटीनंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. (Dr. Meenal Patil-Khatgaonkar met Union Home Minister Amit Shah)
गत लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून आयात करुन प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. आता चिखलीकर यांच्या जागी भाजपकडून दुसरा उमेदवार देण्याची चाचपणी सुरु आहे. अशात मागील आठवड्यात पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्यापूर्वी काही तास आधीच मीनल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली.
Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात
त्यानंतर आता डाॅ. मीनल पाटील-खतगावकर यांची अमित शाह यांची आवर्जून भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही. मात्र खतगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या भेटीबाबत माहिती दिली. अमित शाह यांचा मराठवाडा दौरा अत्यंत व्यस्ततेचा आहे. आधी अकोला, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला गेले होते. त्यानंतर ते जळगाव आणि मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या व्यस्ततेमध्येही मीनल पाटील-खतगावकर यांना भेट दिल्याने नांदेड लोकसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.
2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
काँग्रेसमध्ये असतानाही सुरु होती तयारी :
काँग्रेसमध्ये असतानाही मीनल पाटील-खतगावकर लोकसभेसाठी इच्छुक होत्या. त्यांनी तशी तयारीही सुरु केली होती. अशोक चव्हाण यांनीही खतगावकर यांना तयारी सुरु करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी नायगाव, देगलूर, बिलोली, मुखेड या भागात संपर्क अभियानही सुरू केले होते. मात्र चव्हाण यांनीच ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील सारी समीकरणेच बदलली. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर यांची आघाडीवर असलेली नावे मागे पडून मीनल पाटील खतगावकर यांचे नाव चर्चेत आले.