Maidan: अजय देवगणचा ‘मैदान’ एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Maidan: अजय देवगणचा ‘मैदान’ एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Maidan New Poster Released: अजय देवगणने (Ajay Devgan) आज त्याच्या आगामी ‘मैदान’ (Maidan Movie) चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, फुटबॉलच्या इतिहासावर अमिट छाप सोडणाऱ्या व्यक्ती, संघ, राष्ट्र आणि अतूट विश्वास यांच्या विलक्षण कथेचा साक्षीदार व्हा! पुढे, अजय देवगणने चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही सांगितली आहे, 7 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर ‘मैदान’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षकावर आधारित असणार: या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानले जाणारे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सय्यद अब्दुल रहमान यांनी 1950 ते 1963 पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम केले. ‘मैदान’मध्ये अजय देवगणशिवाय प्रियमणी आणि गजराज राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बोनी कपूर आणि झी स्टुडिओच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.

‘मैदान’चे पोस्टरही युजर्सना आवडले: चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, जिथे एका यूजरने लिहिले आहे की, ‘मैदान’ ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, अजय देवगण माझा आवडता अभिनेता आहे. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरणार आहे.

चित्रपट बराच काळ रखडला होता: 2018 मध्ये ‘मैदान’ची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. निर्मात्यांना 2023 मध्ये पुन्हा ‘मैदान’ रिलीज करायचा होता. मात्र, गेल्या वर्षी ‘टायगर 3’, ‘ॲनिमल’, ‘डंकी’ सारख्या रिलीज झाल्यामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. आता अखेर ईदच्या मुहूर्तावर ‘मैदान’ प्रदर्शित होणार आहे.

सारा आणि करिश्मा अडकणार संशयाच्या भोवऱ्यात; ‘मर्डर मुबारक’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अजय देवगण लवकरच ‘शैतान’मध्ये दिसणार आहे. ‘शैतान’ हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा काळी जादू आणि वशिकरणवर आधारित आहे. जिथे माधवन ‘शैतान’च्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे. या सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त आर माधवन, दक्षिण अभिनेत्री ज्योतिका आणि जानकी बोडीवाला दिसणार आहेत. विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 8 मार्चला रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube