मस्साजोग ग्रापंचायत निवडणूक जाहीर होताच संतोष देशमुखांच्या घरी चोरी, काय घडलं?

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे.

News Photo   2026 04 10T144308.437

मस्साजोग ग्रापंचायत निवडणूक जाहीर होताच संतोष देशमुखांच्या घरी चोरी, काय घडलं?

बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Beed) यांच्या घरासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे.  देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे.

सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी धनंजय देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी केली तर तलावाच्या परिसरात असलेले कॉपर केबल चोरून नेले आहे.

बीड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर, मस्साजोगकडं राज्याचं लक्ष

या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे. केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम देखील मस्साजोग परिसरात दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे. चोरीच्या या घटनेबाबत बोलताना धनंजय देशमुख यांनी माहिती दिली आहे.

देशमुख म्हणाले की, गावातील 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाली. आमच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेलेले नाही. मात्र इतरांच्या घरातून सोनं, रोख रक्कम चोरीला गेली आहे तर अनेक शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहे ज्याची किंमत 7 लाखांपर्यंत आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.

 

Exit mobile version