बीडमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वारंवार वाढतच आहेत. (Beed) आता आष्टी तालुक्यातून धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. ‘तू माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, नाहीतर तुला विषारी द्रव्य पाजून संपवेल,’ अशी धमकी देत एका 48 वर्षीय महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सावधान! मुलगी एकच, लग्न नऊ, बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी
आष्टी तालुक्यातील एका गावात दुपारच्या सुमारास महिला घरात एकटी होती. तेव्हा दोन आरोपी तिथे आले आणि महिलेसोबत पतीशी मैत्री असल्याचे सांगून बोलू लागले. तेव्हा त्यांनी महिलेचा मोबाईल मागितला. मात्र, तिने मोबाईल देण्यास विरोध दर्शवला. तेव्हा आरोपींनी तिच्याशी झटापट करून गैरकृत्य केलं.
माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर
तू माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, नाहीतर तुला विषारी द्रव्य पाजेल अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. तसंच तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महादेव किसन शिंदे आणि तानाजी अशोक थोरात (दोघे रा. सराटेवडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अंभोरा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
