Download App

…तर पक्षाचे नाव बदलून ‘भ्रष्ट जन पार्टी’ ठेवा; उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप केला आहे.

पुढं म्हणाले, मोदी म्हणत आहेत की माझी प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात आहे. ती आम्ही करत आहोत का? आणि तुमची प्रतिमा खराब होत असेल तर आमची प्रतिमा नाही का? तुमचा कोणी सोम्या गोम्या वारेमाप आरोप करणार आणि आम्ही गप्प बसणार का? आम्ही काही म्हटले की आमच्यावर खटले दाखल केले जात आहेत. मोदींना काही म्हटले की ओबीसींचा अपमान म्हणतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

‘खरोखर तुमच्यात धमक असेल तर….’; अजित पवारांचं भाजपला चॅलेंज

मला हा प्रश्व विचारायचा आहे की तुमचे नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज संपूर्ण देशातील परिस्थिती काय आहे, विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास दिला जात आहे. आरोप केले जात आहेत, चरित्रहनन केले जात आहेत. तुरुंगात टाकले जात आहे. दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात हे भाजपचे धोरण आहेत. देशातील सर्व भ्रष्ट लोक भाजपमध्ये आहे आणि नाव भारतीय जनता पक्ष असेल तर हा भारतीय जनतेचा अपमान आहे. भ्रष्ट लोक तुमच्या पक्षात घेणार असेल तर पक्षाचे नाव बदलून भ्रष्ट जन पार्टी ठेवा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

एक काळ असा होता की भाजपच्या व्यासपीठावर साधु संत असायचे पण आता बघितले तर आता संधीसाधु दिसत आहेत. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुखांचा जमाना होता. संपूर्ण देशात एक विधान, एक निशान आणायचा यांचा विचार आहे आणि हा विचार धोकादायक आहे. देशातील लोकशाही संपवून टाकायची. आपल्या पक्षाशिवाय दुसरा कोणताच पक्ष शिल्लक ठेवायचा नाही आणि राहिलाच तर त्याला तुरुंगात टाकायचे. आपला नेता तिकडे बसवायचा ही अध्यक्षीय लोकशाहीकडे चाललेली वाटचाल आहे, अशी हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

Tags

follow us