‘खरोखर तुमच्यात धमक असेल तर….’; अजित पवारांचं भाजपला चॅलेंज

‘खरोखर तुमच्यात धमक असेल तर….’; अजित पवारांचं भाजपला चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या मुद्यावर सध्या देश चांगलाच पेटला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून तर सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, तत्कालीन राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कायम महापुरूषांचा अवमान करत होते, तेव्हा भाजप आणि शिंदे गट मूग गिळून गप्प का होता? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. खरोखर तुमच्यात धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, अशा शब्दात त्यांनी भाजप-शिंदे गटाला ललकारलं.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत बोलतांना अजित पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढले होते. त्यावेळेस भाजप आणि शिंदे गटानं राज्यपालांविषयी ब्र शब्दही काढला नाही. ते आज ज्या पध्दतीने सावरकर गौरव यात्रा काढतात, तशी त्यावेळेस राज्यपालांविरोधात का भूमिका घेतली नाही. त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? तेव्हा का मूग गिळून गप्प होता, अशी टीका केली.

आमची सावरकरांवर श्रद्धा आहेत. आता तुमचं राज्यात सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे. तुमच्यात खरोखर धमक असेल तर तुम्ही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन दाखवा. निव्वळ राजकारण करण्यासाठी सावरकरांच्या नावाचा उपयोग करू नका, असं ते म्हणाले.

राज्यात महागाई वाढते आहे, बेरोजगारी वाढते आहे. त्याच्याकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. सरकारने सांगितलं की, आम्ही 75 हजार नोकरभरती करणार. आतापर्यंत किती  लोकांना दिली नोकरी? अद्याप नोकरीभरतीला सुरूवात झाली नाही. नोकर भरती करणार, पण कधी करणार नोकरभरती… हे सरकार केवळ नोकर भरतीचं आश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात उद्योग येत होते. आता या सरकारचा पायगुण चांगली नाही. कारण उद्योगही आता बाहेर जाऊ लागले आहेत.

संभाजीनगरच्या सभेतून बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकरवर हल्लाबोल

या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांशी काही कर्तव्य उरलं नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं सरकार नमलं नाही. कादा अनुदाना दिलं. पण अटी घातल्या. कांदा, कापूस प्रश्नावर हे सरकार काहीच भूमिका घेत नाही. अद्याप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अवकाळी पावसाचे पैसेही शेतकऱ्याला मिळाले नाहीत. फक्त आणि फक्त हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, असं ते म्हणाले.

महागाई आणि बेरोजगारीवरून सामान्यांचं लक्ष हटवं याासाठी हे राज्यात घटना घडवल्या आहेत. महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणूनही घटना घडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube