Download App

आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात

Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत.

मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हवालदिल झालेला शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. आज दुपारी अरणविहीरा परिसरात झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील डोंगराळ भागात हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होते तशी परिस्थिती झाली होती.

दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल

बीड जिह्यात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. अवकाळी पावासाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब पडले तर शेतात गारांचा खच पडला होता. हजारो रुपये खर्च करून वाढवलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाली. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा, गहू, हरभरा अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आष्टी तालुक्यातील अरणविहिरा, पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, मराठवाडी या संपूर्ण परिसरातील गावांमधील या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांचेकडे केली आहे.

Tags

follow us