निलंगा : गेल्या अनेक वर्षापासून निलंगा विधानसभा मतदारसंघात (Nilanga Assembly Constituency) सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम आमदार तथा भाजप-महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) करत आले. त्यांनी मतदारसंघात कधीच जातीय तेढ निर्माण होऊ दिले नाही. अशा सर्वधर्म समावेशक विचार घेऊन काम करणाऱ्या संभाजीराव पाटील निलंगेकरांना सर्वच अल्पसंख्यांक समाजाने खंबीरपणे साथ देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आव्हान निलंगा नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती इरफान सय्यद (Irfan Syed) यांनी केले.
संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!
निलंगेकरांनी सर्वच समाजघटकांना न्याय दिला…
ते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत केले. पुढे बोलताना सय्यद म्हणाले, संभाजीराव पाटील निलंगेकर हे राजकीय क्षेत्रात काम करीत असताना 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्राप्रमाणे काम करतात. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहेत. मी गेल्या 24 वर्षापासून त्यांचे काम पाहतो आहे, सर्व समाज घटकांना कसा न्याय देता येईल, याचा प्रयत्न नेहमी ते करत असतात. सबका साथ, सबका विकास या न्यायाने सगळ्या धार्मिक क्षेत्राला आणि सर्व जातीतील लोकांना ते समान न्याय देतात.
कॉंग्रेसचं बेडगी प्रेम…
सय्यद म्हणाले, स्वातंत्र्याच्या 60 वर्षाच्या काळात काँग्रेसने नेहमी मुस्लिम व दलितांबद्दल बेगडी प्रेम दाखवून या दोन्ही समाज घटकाला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले. परंतु भाजपने आणि संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी कसल्याही प्रकारचा धर्म आणि समाजाचा भेदभाव न करता भारतीय नागरिक या नात्याने सर्वांना समान न्याय देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने केलं, असं सय्यद म्हणाले.
ते म्हणाले, मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. निलंगा शहराबद्दलच बोलायचे झाले, तर मुस्लिम समाजातील गोरगरीब जनतेला लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयाचा खर्च झेपत नव्हता, त्यासाठी त्यांनी निलंगा येथे भव्य दिव्य असा तीन कोटी रुपयाचा शादीखाना मंजूर करून तो बांधूनही दिला. त्यामुळे अडचणीतील गरजू मुस्लिम समाजाला त्याचा खूप मोठा फायदा आज होत आहे.
पुढं ते म्हणाले, संभाजीराव पाटील निलंगेकरांनी निलंग्यातील हजरत पिरपाशा दर्ग्याला 4 कोटी रुपये, दर्गा दादापीरसाठी दीड कोटी रुपये त्याचबरोबर दर्गा हालकश्या बाबांच्या कंपाउंड वॉलसाठी वीस लाख रुपये दिले. शिवाजीनगर येथील कब्रस्तानला साठ लाख रुपये दिले. सामान्य गरीब माणसाला त्याच्या हक्काचे घर असावे, या व्यापक विचारातून त्यांनी नगर पालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतून तीनशे घरकुल मंजूर करून दिले, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या वस्त्यात रस्ते व नाल्यासाठी 30 कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवण्याचे काम निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राजकीय क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजाला ज्या- ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी संधी दिली. मागे झालेल्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत मला व इसरत सौदागर यांना नगरसेवक पदासाठी संधी देऊन निवडून आणले. इतकचं नाही तर मला बांधकाम सभापती व त्यांना स्वच्छता सभापतीपद देऊन मुस्लिम समाजाचा एका अर्थाने सन्मानच केला आहे, असं ते सय्यद म्हणाले.