Sachin Trimbak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याचे सचिन त्र्यंबक मेटे (Sachin Trimbak Mete) असं नाव असून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनच्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Tiger 3: अरिजित सिंगच्या गाण्यावर कतरिनाच्या ग्लॅमरस अंदाजाची झलक पाहिलीत का?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन त्रिंबक मेटे(वय ३४) याने आज गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. सचिन हा विनायक मेटे यांचे बंधू त्र्यंबक मेटे यांचा मुलगा आहे. सचिनच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, सचिनने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सचिनच्या आत्महत्येचे वृत्त समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याने एवढे मोठे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सचिनच्या अकाली मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.