Waqf Board Bill : लोकसभेत काल वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Board Bill) मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाच्या चर्चेदरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर रात्री उशिराने आवाजी मतदान पद्धतीने वक्फ बोर्ड बिल मंजूर झालं. या मुद्द्यावरुन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील चांगलेच संतापले आहेत. वक्फ बोर्डात नॉन मुस्लिम सदस्य असणार आहेत, त्यामुळे शिर्डी. तिरुपती, शीख बोर्डावर आम्हाला घेणार का? का फक्त वक्फसाठीच हा निर्णय आहे, असा खडा सवाल जलील यांनी सरकारला केलायं.
‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक 2025’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा, सिने-नाट्य विश्वातील गुणवंतांचे कौतुक
पुढे बोलताना जलील म्हणाले, मुस्लिम पर्सनल बोर्डाने वक्फ बोर्ड बिलाचा निषेध केला आहे. पुढील काळात मुस्लिम पर्सनल बोर्ड जो काही निर्णय घेतील तो आम्ही मानणार असून त्या पद्धतीने पुढील भूमिका ठरवणार आहोत. वक्फ बोर्डात हुशार लोकांना संधी देणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय, मुस्लिम समाजात हुशार नाहीत का? असा सवालही जलील यांनी यावेळी केलायं.
वक्फ बोर्डात बदल गरजेचे होते, तिथं गैरप्रकार झाले आहेत मात्र त्यात असा कायदा नको होता, आधी तिथं घोळ अधिकाऱ्यांनी केले आणि सरकारने पाठीशी घातले.अजित पवार मुस्लिम सोबत आहे सांगतात आता कुठे गेले, असंही ते म्हणाले आहेत.
ग्राहकांच्या आनंदावर विरजण! राज्य वीज वितरण कंपनीच्या वीजदर कपातीला वीज नियामक आयोगाची स्थगिती
आम्ही बिलाला विरोध केला आहे तो कायम आहे, कालच्या भाषणातून फक्त एक मुस्लिम समाजाचा त्यांनी विषय घेतला आणि त्यातून वाद निर्माण केलाय, आता ट्रिपल तलाक झालं औरंगजेब झालं आता मुस्लिम विरोध या बिलातून सुरु आहे. विरोधात समर्थनार्थ आकड्यात फार फरक नाही कायदा बनवताना मतदानाची टक्केवारी बघा.. आकडे होते दादागिरी केली आणि बिल पास केले असल्याचा आरोपही जलील यांनी केलायं.
दरम्यान, मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी महिलांना स्थान देण्यासाठी बिल आणले म्हणतात, लाडकी बहिणीला न्याय दिला का, महिला आरक्षण बाबत कोट्यवधी खर्च केले महिलांना न्याय दिला का? असा सवाल त्यांनी केला.