Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपतींच्या भेटीला…

Waqf Board Bill : लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक (Waqf Board Bill) मंजूर झाल्यानंतर आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडे शेवटचा एकच पर्याय उरलायं, तो म्हणजे राष्ट्रपतींची भेट घेत साकडं घालणं. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीची भेट मागितली असून राष्ट्रपतींनी विधेयकावर सही करु नये, अशी विनंती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करणार आहे. यासंदर्भात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून निवेदन काढण्यात आलंय.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने निवेदनात म्हटलं, “अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या वक्फ कायद्याला राष्ट्रपतींनी संमती देण्यापूर्वी त्यावर आमची चिंता व्यक्त करण्यासाठी आम्ही भारताच्या राष्ट्रपतींकडे त्वरित भेटीची मागणी करत आहोत.
या कायद्याद्वारे सादर केलेल्या दुरुस्तीमध्ये वक्फ संस्थेच्या प्रशासनावर आणि स्वायत्ततेवर परिणाम करणारे महत्त्वपूर्ण बदल समाविष्ट केले आहेत, ज्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक आणि धर्मादाय कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गर्भवती महिलेला कॅन्सर नव्हताच, रुग्णालयाचा आरोप खोटा; आमदार गोरखेंचा दावा
तुमची भेट घेण्याचा आमचा उद्देश नुकत्याच मंजूर झालेला (दुरुस्ती) कायदा 2025 आणि याची देशभरातील मुस्लिम समुदायावर होणाऱ्या परिणामाबाबत आमची तीव्र चिंता व्यक्त करणे आहे. त्यात पुढे असंही म्हटलं आहे की, “हा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे आणि हा देशातील मुस्लिमांवर हल्ला आहे. आमचा विश्वास आहे की कायद्यातील तरतुदींवर गांभीर्यानं पुनर्विचार करणं आवश्यक आहे कारण ते भारतीय राज्यघटनेनुसार हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांशी विसंगत आहेत, विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य, समानता आणि धार्मिक संस्थांच्या संरक्षणासंदर्भात”
शेवटी आदरणीय राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो की, “या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, आम्ही आमच्या राष्ट्रपतींना नम्रपणे विनंती करतो की, आम्हाला आपल्या सोयीनुसार तातडीची भेट मंजूर व्हावी, जेणेकरून आम्ही आमच्या समस्या मांडू शकू आणि घटनात्मक चौकटीत संभाव्य ठरावांवर चर्चा करू शकू” असं निवेदनात म्हटलंय.
दरम्यान, 4 एप्रिल रोजी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉ. इलियास यांनी बोर्डाचे सरचिटणीस मौलाना फजलुर रहीम मुजद्ददी यांनी लिहिलेलं हे पत्र प्रसिद्ध केलं आहे