तरुणीनं भररस्त्यात गालात लगावली; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

News Photo   2026 05 17T170551.868

तरुणीनं भररस्त्यात गालात लगावली; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

बीड जिल्ह्यातील मोहा येथे अत्यंत (Beed) धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीनं भररस्त्यात सर्वांसमक्ष थोबाडीत मारल्याने झालेला अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणाच्या मृत्यूपूर्वी वडिलांना केलेल्या फोनमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. मृत तरुणाचं नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे असं आहे. 13 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका तरुणीने करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष त्याला थोबाडीत मारल्याचं सांगितलं जाते. या घटनेनंतर चंद्रहार शिंदे मानसिक तणाव आणि नैराश्यात गेल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

भूसंपादन घोटाळा! बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

14 मे रोजी सायंकाळी चंद्रहार याने आपल्या वडिलांना फोन करून, “हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्याने फोन बंद केला. या वाक्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं. वडिलांना फोन केल्यानंतर चंद्रहार शिंदे मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे गेला. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलं. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून या घटनेमागील सर्व परिस्थितींचा सखोल तपास केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अपमानामुळे चंद्रहार शिंदे हा मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे मानसिक आरोग्य, सामाजिक दबाव आणि सार्वजनिक अपमान यांसारख्या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version