Heat Wave : राज्यात उन्हाच्या झळा कायम असून राज्यातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट (Heat Wave) जारी करण्यात आलायं. पुढील दोन दिवस अकोला, वर्धा, अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर आता उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलायं. त्यामुळे आता पुढील दोन दिवस तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. यासोबतच गगडचिरोली, नागपूर, चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांत पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदूर्ग जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलायं.
भाविकांवर काळाचा घाला; नैनितालमध्ये 100 फूट खोल दरीत कार कोसळून लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू
भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलायं. नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तर गोंदिया जिल्ह्यात 45 अंशावर तापमान गेलं असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत.
पुणे रेल्वे स्टेशनजवळ वन्यजीव तस्करीचा मोठा पर्दाफाश; शेकरू आणि स्टार कासवांसह दोघे ताब्यात
भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
“प्रीतम अँड पेड्रो” मध्ये झळकणार वीर हिरानी, अरशद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंह
अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत चढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता.
