“प्रीतम अँड पेड्रो” मध्ये झळकणार वीर हिरानी, अरशद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंह
अरशद वारसी ‘पेड्रो’ च्या भूमिकेत दिसत असून दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री आणि मजेशीर डायनॅमिकची झलक पाहायला मिळते.
“Pritam and Pedro” movie : गोव्याचा गोंधळ, सायबर क्राईम, गैरसमज आणि त्या सगळ्याच्या मधोमध अडकलेले दोन पूर्णपणे वेगळे स्वभावाचे लोकं ! हे सगळं एकत्र आलं तर काय होईल? ‘प्रीतम अँड पेड्रो’चा टीझर प्रेक्षकांना एका भन्नाट आणि हटके दुनियेची पहिली झलक देऊन जातो जिथे डेटा भिडतो दांड्याशी, गोंधळ भिडतो गैरसमजांशी, आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असतात दोन अगदी विसंगत व्यक्ती.
टीझरमध्ये वीर हिरानी ‘प्रीतम’ च्या भूमिकेत आणि अरशद वारसी ‘पेड्रो’ च्या भूमिकेत दिसत असून दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री आणि मजेशीर डायनॅमिकची झलक पाहायला मिळते. विक्रांत मेस्सीच्या ‘मार्टिन’ या व्यक्तिरेखेमुळे कथेत अधिक रहस्य निर्माण होतं तर दुसरीकडे बोमन इराणी आणि मोना सिंह यांच्या भूमिकामुळे हा वेडेपणा, विनोद, रहस्य आणि हिरानी-स्टाईल शैली मधून हे विश्व अधिक रंगतदार बनणार यात शंका नाही.
नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशांना मोठा विलंब
प्रसिद्ध दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली आणि राजकुमार हिरानी यांची बहुप्रतीक्षित ओटीटी पदार्पण असलेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही कलाकृती विनोद, रहस्य आणि प्रचंड गोंधळाने भरलेली एक अनपेक्षित सफर ठरणार आहे. “प्रीतम अँड पेड्रो” ३ जुलैपासून फक्त JioHotstar ( जिओहॉटस्टर ) वर