मोठी बातमी! परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोलीच्या विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के…

Mild earthquake परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोली आणि पुसद आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

Earthquake (1)

Earthquake (1)

Mild earthquake tremors felt in various parts of Parbhani, Washim, Nanded, Hingoli : परभणीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणी शहरांमध्ये आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वाशिम, नांदेड, हिंगोली आणि पुसद या भागामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत.

भूमरेंच्या ड्रायव्हरला अटक होणार? कोट्यवधींच्या हिबानामा प्रकरणात गुन्हे शाखेची मूळ मालकाला अटक

परभणीमध्ये सकाळी आठ वाजून 45 मिनिट आणि आठ वाजून 46 मिनिटांच्या सुमारास भूकंपाची सौम्य धक्के जाणवले. यामध्ये परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आणि पुसद या ठिकाणी हे सौम्य धक्के जाणवल्याचं पाहायला मिळालं. तसेच काही ठिकाणी आवाज देखील झाल्याचं स्थानिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

चर्चा फलित झाली नाही तर… इस्लामाबादेतील चर्चेअगोदर ट्रम्प यांची इराणला धमकी…

त्यामुळे काही ठिकाणी नागरी घरा बाहेर पडल्याचं देखील पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता? तसेच या भूकंपाची तीव्रता किती होती? याची सर्व तपासणीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असा आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे.

Exit mobile version