भूमरेंच्या ड्रायव्हरला अटक होणार? कोट्यवधींच्या हिबानामा प्रकरणात गुन्हे शाखेची मूळ मालकाला अटक
Shivsena MP Sandipan Bhumare यांच्या चालकाच्या नावे केलेल्या जमिनीच्या हिबानामा प्रकरणामध्ये जमिनीच्या मूळ मालकाला अटक करण्यात आली आहे.
Shivsena MP Sandipan Bhumare’s driver will arrested Crime Branch arrests original owner in multi-crore embezzlement case : शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकाच्या नावे करण्यात आलेल्या जमिनीच्या हिबानामा प्रकरणामध्ये जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली याला अटक करण्यात आली आहे. मीर मेहमूद अली याच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चर्चा फलित झाली नाही तर… इस्लामाबादेतील चर्चेअगोदर ट्रम्प यांची इराणला धमकी…
गेल्या काही दिवसांपूर्वी हा जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तीन दिवसांमध्ये तपासासाठी हजर न राहिल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद खानवर देखील अटकेची टांगती तलवार आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये हिबानामा प्रकरण गाजलं होतं. हे प्रकरण कोट्यावधी रुपयांचं आहे. यामध्ये संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर असलेला जावेद रसूल शेख याला हैदराबादच्या मीर मेहमूद अली यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोक्याची जमीन हिबानामा करून दिलेली होती. या संदर्भात परभणीमधील एका वकिलाने आक्षेप घेत आपल्याला देखील अशाच प्रकारचा हिबानामा करून देण्यात आला होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता.
कोणत्या राशींना होणार फायदा अन् कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या सविस्तर…
या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरचे आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली या चौकशीनंतर भुमरे यांचा ड्रायव्हर आणि मीर मेहमूद अली दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये जावेद शेखने एक अटकपूर्व जामीनाचा अर्ज देखील दाखल केला होता. त्यानंतर तो मागे देखील घेण्यात आला. यातील मूल मालक मीर मेहमूद अली याला अटक करण्यात आल्यानंतर आता भुमरे यांच्या ड्रायव्हरला देखील अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.