अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन; दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपकेसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

Abhijeet Dipke Grandmother Death; अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Abhijeet Dipke Grandmother Death

Abhijeet Dipke Grandmother Death: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीला गेलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे शनिवारी (10 ऑक्टोबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. एकीकडे अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानात शिरून ताब्यात घेतले तर, दुसरीकडे त्यांच्या आजीच्या निधनाचे वृत्त समोर आल्याने दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.

‘प्रिय, पंतप्रधान अंबानी!’ एलॉन मस्क यांची पोस्ट चर्चेत, स्टारलिंकच्या परवानगीवरून मोदी सरकारवर निशाणा

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना आजीच्या निधनाचे वृत्त

अभिजीत दिपके हे आज (10 ऑक्टोबर) सकाळी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनासाठी दिल्लीला रवाना झाले होते. मात्र, त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर दिपके यांच्या आई-वडिलांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती.

ब्रेकिंग: अभिजीत दिपकेसह सहकाऱ्यांना विमानातूनच पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाचं काय होणार?

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी हे दिपके कुटुंबीयांचे मूळ गाव आहे. अभिजीत यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

ध्रुव राठीला गुरुग्राममधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा, सीजेपीच्या आंदोलनापूर्वी मोठी खळबळ

अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतणार?

अभिजीत दिपके यांच्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय संतूक पिंपरी येथे जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अभिजीत दिपके सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रात परतता येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

follow us