Radhakrushna Vikhe Patil : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी सभागृहात दुध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये तर शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीयं. दुधाचे हे वाढीव दर 1 जुलैपासून राज्यभरात लागू केले जाणार असल्याचं स्पष्ट करत दुध भुकटीसाठी प्रति किलो 30 रूपये अनुदान देण्यात येणार असल्याचं विखे यांनी स्पष्ट केलयं. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिलासादायक! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दंत उपचारांचा समावेश : आरोग्यमंत्री सावंत
दुधाच्या दरावरून राज्यभरात दुध उत्पादक शेतकरी चिंतेत असताना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि दुधाचे दर निश्चित करण्यासाठी सोमवारी मंत्रालयातील सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तसेच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांसह माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत दोन मोठे बदल; शिंदेंची महत्त्वाची घोषणा, Video
सदर बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधसंघाच्या अडचणी समजून घेतल्या असून दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यावर सविस्तर चर्चा केलीयं. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात दिलीयं. राज्यात सध्या सहकार दुध संघ आणि खासगी दुध संघाकडून प्रतिदिन साधारण 1 कोटी 62 लाख 80 हजार दुध संकलन केले जाते. त्यातील दुधाची गरज पूर्ण झाल्यावरही अतिरिक्त दूध हे भुकटी तथा बटर बनविण्यासाठी पाठविले जाते. याबाबतही सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली. भुकटी व बटर प्रकल्पांनाही नुकसान होणार नाही, यासाठी सरकार विचाराधीन असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच अनुदानाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून रखडलेल्या अनुदानासाठी 15 जुलैपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्यायावत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलीयं. तर सरसकट खासगी तथा सहकारी दुध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतिलिटर दर दिला जाणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलयं.