Download App

आंबेडकरांसोबत जायला एका पायावर तयार! ‘इंडियाने’ डावललेल्या ‘वंचित’ला ‘एमआयएम’ची साद

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बोलविल्यास त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पुन्हा एका साद घातली. ते महाराष्ट्र टाईम्स या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे आता आगामी काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन औवेसी हे एकत्र दिसणार का असा सवाल विचारला जात आहे. (MIM MP Imtiaz Jalil once again offered the Vanchit Bahujan Aghadi an alliance)

काय म्हणाले इम्तियाज जलिल?

2020 मध्ये जेव्हा आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो त्यावेळी माझ्या जिंकण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा वाटा होता. त्यावेळी महाराष्ट्रात एक जोश निर्माण झाला होता. विशेषत: दलित समाज, ओबीसीमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. आता आपल्यालाही संधी मिळणार आहे, अशी भावना या सर्वांची तयार झाली होती. ते खूप चांगल्या रीतीने चाललं होतं पण विधानसभेवेळी तिकीट वाटपामध्ये चर्चा फिस्कटली आणि आमची आघाडी तुटली.

Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका

पण आम्ही आजही मानतो की,मोठा दलित समाज बाळासाहेब यांच्याबाजूने उभा आहे. त्यामुळे एमआयएम आणि आणखी काही पक्ष एकत्र आले तर एक मोठी स्ट्रॉंग फोर्स तयार होऊ शकेल. आजही जर बाळासाहेबांनी हाक मारली तर आम्ही एका पायावर त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत, असे खासदार जलिल म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीकडून दिला जात असलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध केला.

“मी पुण्याचा सहपालकमंत्री; आढावा बैठक घेणारच” : अजितदादांचाच डाव चंद्रकांतदादा त्यांच्यावरच खेळणार

इंडिया आघाडीवर टीका :

आज ज्या प्रकारे इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला वागणूक देत आहेत, ते बघून वाईट वाटते. याचा अर्थ आहे की तुम्हाला त्यांच्या समाजाचे मते पाहिजेत पण त्यांच्या नेतृत्व नको. त्यांना आमच्या समाजाची मते पाहिजेत पण त्यांना ओवेसी किंवा इम्तियाज जलिल त्यांच्या बाजूला बसलेला नको. आमचे नेते राहुल गांधीच राहणार. शरद पवार साहेब नेता राहणार आहे. लालूप्रसाद राहणार आहे, असा टोलाही जलिल यांनी लगावला.

वंचित-एमआयएम युती :

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तेव्हाचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमची युती होती. या दोघांच्या संयुक्त आघाडीला वंचित बहुजन आघाडी हे नाव देण्यात आले होते. या आघाडीने लोकसभेत लक्षणीय मते घेतली. त्यावेळी या आघाडीवर भाजपची बी टीम अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी एमआयएम या आघाडीतून बाहेर पडले. तर प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन संघाला वंचित बहुजन आघाडीत विलीन केले.

follow us