“मी पुण्याचा सहपालकमंत्री; आढावा बैठक घेणारच” : अजितदादांचाच डाव चंद्रकांतदादा त्यांच्यावरच खेळणार
पुणे : पालकमंत्रीपद गेले असले तरी काळजी करु नका. भाजपच्या (BJP) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. कायद्यानुसार मी सहपालकमंत्री आहे, त्यामुळे या पुढील काळातही पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे सुरूच ठेवणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. पालकमंत्रीपदावरुन हटविल्यानंतर शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. (Conflict between chandraknat Patil and ajit pawar on pune guardian ministry)
According to the law, I am the joint guardian minister. We will continue to review the development works in Pune in the next period as well)
पुण्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा आणि शहर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी नुकतीच चंद्रकात पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ‘ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांनाच पदे मिळणार असतील, तर यापुढील काळात जिल्ह्यात पक्ष वाढणार कसा,’ असा प्रश्न अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना विचारला.
अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; अभिषेक मनु सिंघवींचा दावा
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
‘आपण पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत. त्यानुसार दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेऊन भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. आपले सर्व कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. आपली कार्यपद्धती ‘जैसे थे’च राहणार असून शासकीय विश्रामगृह येथे सुरू केलेले कार्यालय आणि तिथला कर्मचारी वर्गही तसाच राहणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींना रावणरुपात दाखवलं; यशोमती ठाकूरांनी गोडसेंचा डीएनएचा काढला
चंद्रकांत पाटील टाकणार अजितदादांच्या पावलावर पाऊल :
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी होताच उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार पुण्यात आढावा बैठक घेत होते. पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने पाटील यांच्यासमोर आव्हान उभे राहिले होते. पवार यांच्या या बैठकांमुळे चंद्रकांतदादांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली होती. आता चंद्रकांतदादाही आढावा बैठक घेणार आहेत.