अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; अभिषेक मनु सिंघवींचा दावा

अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; अभिषेक मनु सिंघवींचा दावा

Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली आहे. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा केला असून अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं आहे.

तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, आधी निवडणूक आयोगाने आमचं संपूर्ण ऐकून घ्यावं, त्यानंतरच निर्णय द्यावा राष्ट्रवादी पक्षात वाद आहे की नाही याची तपासणी करावी. अजित पवार गटाच्या युक्तीवादाचं आम्ही विरोध केला पण निवडणूक आयोग प्राथमिक स्वरुपात हा विरोध मान्य केला नाही. अजित पवार गट जेव्हा संपूर्ण युक्तीवाद करेल त्यांनतर आम्ही पुन्हा युक्तीवाद करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

तसेच खोटे कागदोपत्रे देऊन कोणीही पक्षात वाद असल्याचं सांगू शकत नाही, राष्ट्रवादी हा दोन पक्ष असल्याचं कोणीही सांगू शकत नाही, युक्तीवाद अद्याप आम्ही केलेलं नाही फक्त कागदोपत्रे समोर ठेवलेली आहेत. अजित पवार गटाने खोटी कागदोपत्रे सादर केली आहेत. दुसऱ्या पक्षातल्या लोकांना पक्षाचे सदस्य दाखवलेत, काही लोकांचं निधन झालंयं तेही पक्षाचे सदस्य दाखवलेत, काही लोकांनी सही केली एका ठिकाणी आणि ते व्यक्ती दुसऱ्याचं ठिकाणी राहत असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ आदेश…

दरम्यान, अजित पवार गट पक्षाच्या घटनेपासून गट दूर पळत असून तुम्ही आमदार खासदारांची मोजणी करा सोबतच खासदार आमदारांना किती मत मिळाली तेही पडताळून पाहा असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे मात्र, लोकशाहीत असं कधीच झालं नसल्याचं सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारच सर्व काही बघत आहेत, त्यामुळे ज्यांनी पक्षाची उभारणी केली आहे, पक्षाची संघटना उभी केली ते फक्त शरद पवारच असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? यासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. पुढील सुनवाणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube