राहुल गांधींना रावणरुपात दाखवलं; यशोमती ठाकूरांनी गोडसेंचा डीएनएचा काढला
Yashomati Thakur : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्योराप सुरु करण्यात आले आहेत. अशातच आता भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो टाकत राहुल गांधींना(Rahul Gandhi) रावण रुपात दाखवण्यात आलं. त्यावरुन काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी भाजपला चांगलचं धारेवर धरलं आहे. नथुराम गोडसे आणि भाजपचा डीएनए एकच असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. अमरावतीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Sultan of Delhi: ‘सुलतान ऑफ दिल्ली’च्या ‘साकिया’ गाण्यातून मिलन लुथरियाचे म्युजिकल पदार्पण!
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, भाजपचा डीएनए आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत तेच करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच, चंद्रशेखर बावनकुळेंचा चिमटा
महात्मा गांधी त्या युगातले असो या युगातले असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतात. जी काही विकृती आहे, ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे. यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे, असा आमचा अट्टाहास, असल्याचही ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?
देशात सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने देशातल्या 28 पक्षांच्या एकीचा मोट बांध बांधली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं असून त्यानूसार देशभरात काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेसने हालचाली सुरु केल्यानंतर भाजपकडूनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोणाची रणनीती भारी ठरेल? हे निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे.
महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्षांचा समावेश आहे. राज्यातले विरोधी पक्षातले राष्ट्रवादी, काँग्रेस ठाकरे गटाचा इंडिया आघाडीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला देशभरातून दिग्गज नेते उपस्थित राहिल्याचं दिसून आलं होतं.