शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच, चंद्रशेखर बावनकुळेंचा चिमटा

शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच, चंद्रशेखर बावनकुळेंचा चिमटा

Chandrasekhar Bawankule : शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवायचा आहे, आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, त्यासाठी ते अशी विधान करत आहेत, असा चिमटा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी काढला.

ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, भाजप महाआघाडीत मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणं ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात वावगं काहीच नाही, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असं झालं तर १४-१५ मंत्री वाढतील आमि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल, असं बावनकुळे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या सांगली लोकसभा दौऱ्यावेळी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, आ. गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, सांगली शहर प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, शेखर इनामदार, सत्यजित देशमुख, प्रभाकर पाटील, अमरसिंह देशमुख, रवी पाटील आदी डॉ.रवींद्र आर्ळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते कामगार उपस्थित होते.

योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्ती

महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून साईड पोस्टिंग दिली, त्यांच्यावर खटले भरण्यात आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचीट मिळालेली आहे. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

धार्मिक स्थळांबद्दल बोलणे चुकीचे !

धार्मिक स्थळे मंदिर, मशिदी किंवा बौद्ध विहारांना लष्कराच्या ताब्यात देणं चुकीचं छआहे. सर्वांच्या धार्मिक भावना वेगळ्या आहेत, अधिष्ठान वेगळे आहेत. त्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी बोलणं योग्य नाही.

मोदी-मोदीचा जल्लोष; कामगारांशी संवाद

आपल्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्षांनी दुपारी तासगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर विधानसभा मतदारसंघ आणि दुपारी मिरज, सांगली आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि ‘सुपर वॉरियर्स’ यांच्याशी संवाद साधला. सुपर वॉरियर्सच्या मेहनतीमुळे सांगलीचे खासदार पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तासगाव येथील गणपती मंदिर ते बागणे चौकापर्यंत आणि मिरज येथं ते घर चलो अभियानात सहभागी झाले. त्यांनी व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला. पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारताच सर्वांनी मोदी-मोदीचा जयघोष केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube