Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका

Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसात मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांना काढावे लागेल, राजीनामा घ्यावा लागेल. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. कायमच अजित पवार नाराज असतात. त्यांच्या मनासारखे काही काम झालं नाही, तर ते असं करत असतात. (Maharashtra Politics) त्यांची ही नाटक कायम असतात. नेहमी नाराज राहायचं आणि आपलं वर्चस्व तयार करायचं. आणि आपलं काम करून घ्याच. आमच्या मंत्रीमंडळात देखील त्यांनी हेच कायम केलं आहे. कधी ते नाराज होत असतात, तर कधी मोबाईल बंद ठेवतात. कधी नॉट रीचेबल होतात. तर कधी त्यांना ताप होतो. आजकाल त्यांना या गोष्टींचा जास्त त्रास होऊ लागला आहे, यामुळे हे राजकीय आजार त्यांना होऊ लागला अशी जळजळीत टीका विजय वडेट्टीवार यांनी केली..

तर दुसरीकडे अजित पवार आजारी असल्याची माहिती देखील समोर आली. अजित पवारांची (Ajit Pawar) प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी काही कार्यक्रमांना गैरहजेरी दर्शवली आहे. काही नेतेमंडळी अजित पवारांच्या तब्येतेची चौकशी देखील करत आहेत.परंतु अजित पवार आजारी नसून नाराज असल्याची चर्चा सध्या सर्वत्र जोर धरत आहे. या संदर्भात आता कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जळजळीत टीका केली.

शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणारच, असा विश्वास कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या १६ आमदारांवर कारवाई देखील केली जाणार आहे. आजचं मरण उद्यावर एवढाच वेळकाढूपणा होत आहे. जर त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्न नसता, तर हे प्रकरण एवढ्या लांबवणीवर जाण्याची आजोबाच्या गरज नव्हती. परंतु त्यांना अपात्र करण्याच्या कारवाईतून आता कुणी सोडू शकणार नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’; पटोलेंचा भाजपला इशारा

तसेच कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या या ९ मंत्र्यांना काढण्याची तयारी चालू सुरु झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यांना घरी जावंच लागणार आहे. त्यांनी या सर्वाना शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, गोमूत्र शिंपडून बघितलं तरीदेखील ते शुद्ध झाले नाही. वॉशिंग मशिनमध्ये टाकून बघितलं तरी ते स्वच्छ झाले नाही. ते म्हणतात ना ‘ये दाग बडे जिद्दी है.. निकलते ही नहीं.. अशी स्थिती सध्या या मंत्र्यांची होत आहे. त्यांना काढण्याशिवाय आजिबात पर्याय नाही. कारण त्या मंत्र्यांच्या विरोधात तक्रारी भाजपाच्याच लोकांनी केल्या आहेत. जर कुणी मंत्री शेतकऱ्यांना लुटत असेल, तर शेतकऱ्यांशी खेळ करणाऱ्या असा मंत्र्याला पदावर राहायचा अधिकार आहे का? हे आम्ही नाही, पीएमएलए न्यायालय विचारत आहे. जर सरकारमध्ये थोडी जरी प्रामाणिकपणाची जाणीव असेल तर त्यांनी तातडीने हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube