सुशिक्षित मुस्लीम तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न; निदा खान प्रकरणात ओवेसींची उडी

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता.

News Photo   2026 05 09T161716.213

मुस्लीम सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न; निदा खान प्रकरणात ओवेसींची उडी

एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी (MIM) आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. ओवेसी यांनी आज त्यांच्या पक्षाच्या नगरसेवक आणि प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR मोहीमे दरम्यान आपण काय कामे करायची याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ओवेसींनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओवेसी यांनी नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता. पोलीस जवळपास महिन्याभरापासून तिला शोधत होते. या प्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल झालाय आणि त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर असदुद्दीन ओवेसी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका मांडली.

निदा खान प्रकरणात आला मोठा ट्विस्ट, कोठडीआधी कोर्टात नेमकं काय घडलं?

सर्वात पहिली गोष्ट ही आहे की, टीसीएस कंपनीचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल की, त्या मुलीचा संबंध एचआर विभागाशी नव्हता. या प्रकरणात 9 एफआयआर रजिस्टर झाले आहेत. त्यापैकी एक एफआयआरमध्ये हर्टिंग रिलेजन सिंटेमेंटच्या नावाने निदा खान या मुलीचे नाव लिहिले गेले. तिसरी गोष्ट म्हणजे एफआयआर दाखल होण्यापूर्वीच या मुलीचे ट्रान्सफर झाले होते. तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

या प्रकरणातील जो तक्रारदार आहे तो सत्ताधारी पक्षाचा सदस्य आहे. सत्ताधारी पक्षांशी त्याचा संबंध आहे. चौथी गोष्ट म्हणजे सध्या तरी कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. आम्ही या गोष्टीचं खंडन करतो. काही लोकं या गोष्टीचं मीडिया ट्रायल करत आहेत. मीडिया जर ज्युरीचे काम करणार तर हे धोकादायक आहे”, असं ओवेसी म्हणाले.

एफआयरममध्ये लिहिलं आहे की, तिच्या घरातून एक बुर्खा मिळाला. एक नकाब मिळाला. तिसरी वस्तू म्हणजे एक पुस्तक मिळालं. बुर्खा कधीपासून आक्षेपार्ह झाला? नकाब कधीपासून आक्षेपार्ह झाला? केव्हापासून प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे पुस्तक मिळाले तर ते काय आहे?, असा सवाल ओवेसी यांनी केला.

मी आपल्याला मागे घेऊन जातो. दिल्लीत अशाचप्रकारे मुस्लीम तरुणांना पकडलं होतं. पोलिसांनी काय म्हटलं होतं की, त्यांच्या घरातून मिर्झा गालिबचे पुस्तक मिळाले त्यामुळे ते दहशतवादी आहेत. पण कोर्टाने नंतर त्या गोष्टीला नाकारला. आताच इलाहबाद हायकोर्टाचे एक जजमेंट आलं आहे. कुणीतरी उर्दू शेर लिहिला. तर कोर्टाने सांगितलं की, शेर लिहिला तर काय झालं? त्यामुळं कोर्ट योग्य न्याय देईल, असं ओवेसी म्हणाले.

या मुलीची कोर्टाकडून निर्दोष सुटका होईल. तिच्यावर कोणतीही केस दाखल होणार नाही. हे सगळं मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला खात्री आहे की, कायदा आपलं काम करेल. तुम्ही कुणाला आरोपी बनवता तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला शिक्षा झाली. आरोप लावणारे आहेत त्यांना कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. त्याशिवाय तुम्ही आरोपी म्हणू शकत नाहीत. जो हा आरोप करत आहेत ते केवळ एका द्वेषापोटी करत आहेत.

आता त्या मुलीला अटक करण्यात आली आहे. न्याय प्रक्रिया आपलं काम करेल. कायद्याने जे होईल ते आपल्यासमोर येईल. पण या प्रकरणाला कोणत्या पक्षासोबत जोडणं योग्य नाही, अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली. पत्रकारांनी यावेळी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. कोर्टात आमचा मुलगा त्याचा सामना करेल. यामध्ये कोणतीच अडचण नाही. तो कोर्टात जावून सांगेल. तुम्ही कुणालाही आरोपी करु शकता. मुंबई ट्रेन ब्लास्ट कुणी केला ते सांगा. 80 लोक मारले गेले, आजपर्यंत ते लोकं तडपत आहेत. मालेगाव ब्लास्ट कुणी केला? आजपर्यंत ते लोक तडपत आहेत.

ज्यांचे लोकं मारले गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना अजून न्याय मिळालेला नाही. ज्या लोकांना जेलमध्ये पकडून टाकलं आहे त्या लोकांच्या नातेवाईकांना अजून न्याय मिळालेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच, एवढा उन्माद करु नका. महाराष्ट्राच्या विधानसभेतील किती आमदारांवर गुन्हा दाखल आहे? ते आमदार, खासदार झालेच ना? कायदा काय बोलतो, दोषी आढळत नाही तोपर्यंत आरोपी दोषी ठरत नाही. हे केवळ वातावरण निर्मिती आहे. केवळ ब्रेकिंग न्यूजपुरता मर्यादीत आहे. नंतर सर्व फूस होतं”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला.

Exit mobile version