Minister Aaditi Tatkare News : राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aaditi Tatkare) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आलीयं. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिलीयं. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आलीयं.
नमस्कार,
माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती.
याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 17, 2024
आदिती तटकरे पोस्टमध्ये म्हणाल्या, “माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल” असं तटकरेंनी म्हटलंय.
विधानसभेसाठी भाजपचं स्वपक्षातच धक्कातंत्र; राम कदमांसह दिग्गजांचं तिकीट कापलं जाणार?
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर फेक अकाऊंट ओपन करुन मित्रांसह नातेवाईकांना पैसे मागण्याचे अनेक प्रकार समोर आले होते. अशा प्रकार अकाऊंट हॅकिंगचा फटका मंत्री आदिती तटकरे यांना बसला आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर तटकरेंच्या अकाऊंटवरुन पोस्ट झाल्याची बाब निदर्शनास आलीयं.