विधानसभेसाठी भाजपचं स्वपक्षातच धक्कातंत्र; राम कदमांसह दिग्गजांचं तिकीट कापलं जाणार?

  • Written By: Published:
विधानसभेसाठी भाजपचं स्वपक्षातच धक्कातंत्र; राम कदमांसह दिग्गजांचं तिकीट कापलं जाणार?

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तारखा जाहीर झाल्या असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. जागावाटपाबाबत महायुती (Mahaytuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बैठका सुरू आहेत. अशातच भाजप (BJP) आपल्या विद्यमान आमदारांना तिकीटे नाकारून नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. तिकीट कापल्या जाणाऱ्या आमदारांममध्ये मुंबईतील पाच आमदारांचा समावेश आहे.

‘आप’चा महाविकास आघाडीला पाठिंबा! विधानसभा निवडणूक लढवणार नाही 

भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. भाजप मुंबईतील ज्या पाच आमदारांची तिकीटं नाकारू शकतात, त्यात वर्सोवा – भारती लव्हेकर, घाटकोपर पश्चिम – राम कदम, सायन – तमिळ सेल्वन, घाटकोपर पूर्व – पराग शाहा आणि बोरिवली – सुनील राणे यांचा समावेश आहे.

‘आप’चा महाविकास आघाडीला पाठिंबा! विधानसभा निवडणूक लढवणार नाही 

वर्सोवा मतदारसंघातील विद्यमान भारती लव्हेकर या 2014 आणि 2019 मध्ये निवडून आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे त्यांना भाजपकडून तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी संजय पांडेय यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

घाटकोपर पश्चिममधून राम कदम सलग तीन वेळा आमदार झालेत. मात्र त्यांची उमेदवारीही धोक्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने सुमार कामगिरीचे कारण देत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते. याची दखल घेत भाजपे हा निर्णय घेतल्याचं बोलल्या जातं.

सायनचे आमदार तमिल सेल्वनही यांचाही या यादीत समावेश आहेत. सेल्वन यांच्या जागी राजश्री शिरडकर यांच्या नावाची चर्चा आहे. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाहा यांच्या जागी प्रकाश मेहता यांना तर बोरिवलीतून सुनील राणे यांच्या जागी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा वाद अजूनही मिटलेला नाही. अजूनही काही ठिकाणी पेच पहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube