लाडक्या बहि‍णींसाठी अदिती तटकरेंची मोठी घोषणा! म्हणाल्या या सुविधेचा लाभ घ्या…

Ladaki Bahin Yojana च्या लाभार्थ्यांसाठी मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. तटकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

Aditi Tatkare

Aditi Tatkare

Minister Aditi Tatkare Anounces Special Helpline Number for Ladaki Bahin Yojana : राज्यामध्ये जुलै 2024 पासून सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये झालेले गैरप्रकार पाहता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करायला सुरुवात केली होती. यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून केवायसी प्रक्रिया सुरू आहे.

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

मात्र यामध्ये अनेक योग्य लाभार्थ्यांचे देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे येऊ शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. तटकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला असल्याची माहिती दिली.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत.

या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

Exit mobile version