Chandrakant Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) वाद पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) मराठ्यांना आरक्षण देण्याची आणि सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली. तर जरांगेच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. अशातच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सगेसोरऱ्याच्या अंमलबजावणीबाबत खात्रीशीर विधान केलं.
…तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही, भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा थेट इशारा
राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्च्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपुरमध्ये असतांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे. मात्र, यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता अधिसूचना काढली जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आंदोलन हलक्यात घेऊ नका, पाठिंबा द्यायला शरद पवार येणार…; राष्ट्रवादीचा विखेंना इशारा
एकीकडे राज्यातील ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे मराठा समाज ओबीसींमधून आरक्षण मागत आहे. शिवाय, सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरागेंची आहे. कुणबी मराठा, सगेसोयर आणि हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसींतूनच आरक्षण द्यावे, त्यासाठीच आमचा लढा असल्याचं जरांगे सांगत आहेत. .
तर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये म्हणून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही उपोषण केले होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी लवकरच सगसोयऱ्याची अंमलबजाणी करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाच्या निर्णयावरून आता ओबीसी समाजाची काय भूमिका असणार हेच पाहणं महत्वाचं आहे.
तर झेपणार नाही – जरांगे
मराठ्यांवर अन्यायच केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल. आरक्षण ही काही एकट्या छगन भुजबळ यांची मक्तेदारी नाही, छगन भुजबळांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडूण येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे.मराठ्यांना 13 तारखेच्या आत आरक्षण द्या. तसे झालं नाही तर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचं नाही, असं आज हिंगोलीत समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे म्हणाले.