…तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही, भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा थेट इशारा

…तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही, भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange : ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) अन्य ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केला. यावरूनच मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला. भुजबळांचं ऐकूण मराठ्यांवर अन्याय केला तर 288 मतदारसंघामधून सत्ताधाऱ्यांचा एकही उमेदवार निवडूणयेणार नाही, असा थेट इशारा जरांगेंनी दिला.

शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं…; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट 

मनोज जरांगेंनी आज शांतता रॅलीला सुरुवात केली. त्यांनी आज हिंगोलीत समाज बांधवांना संबोधित केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले, मराठा समाजावर जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा हिंगोली जिल्हा ताकदीने पुढे येतो, हे या जिल्ह्याने दाखवून दिलं आहे. माझं या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला सांगणं आहे की, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज मुलांसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारने मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यावा. एकट्या छगन भुजबळ यांचं ऐकूण जर तुम्ही अन्याय केला तर यादा राखा, असा इशारा जरांगेंनी दिला.

आंदोलन घेऊ नका, पाठिंबा द्यायला शरद पवार येणार…; राष्ट्रवादीचा विखेंना इशारा 

ते म्हणाले, मराठ्यांवर अन्यायच केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल. आरक्षण ही काही एकट्या छगन भुजबळ यांची मक्तेदारी नाही, छगन भुजबळांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडूण येणार नाही. त्यामुळं सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणे गरजेच आहे, असं जरांगे म्हणाले.

तर झेपायचं नाही…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. आरक्षण मिळत नसल्याने मराठ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळत नाही. नोकरी लागत नाही. त्यामुळं आता माघार नाही. मराठ्यांना 13 तारखेच्या आत आरक्षण द्या. तसे झालं नाही तर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचं नाही, असंही जरांगेंनी ठणकावलं

काही लोकांना दंगली व्हाव्यात असं वाटतं. पण आपण तसं होऊ द्यायचं नाही. भुजबळांनी अनेकांना आपल्या विरोधात उभे केले आहे, असेही जरंगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube