Download App

‘उद्धव साहेबांना शरद पवार अन् कॉंग्रेसच्या मांडीवर बसवलं’, मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर घणाघात

Minister Girish Mahajan criticizes Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) लागलेली गळती बंद होण्याचं नाव घेत नाहीये. आता नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी (Girish Mahajan) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधत महाजन यांनी म्हटलंय की, त्यांनी उद्धव साहेबांना शरद पवार अन् कॉंग्रेसच्या मांडीवर बसवलं, ही दलाली पाहा.

शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना संपवली. उद्धव यांना विनती आहे, थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. मी साठ वर्षे काय केलं? हे सर्वाना माहिती आहे. गोरेगाव पत्राचळीत काय केलं? हे मला बोलायला लावू (Maharashtra Politics) नका. तुम्ही शिवसेना संपवली, उद्धव यांना संपवलं शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. राऊतांची बडबड अशीच सुरु राहिली, तर राहिलेली शिवसेना सुद्धा संपेल, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

Video : लाईव्ह कॅमेरासमोर तरूण नग्नावस्थेत बसला, लोकांनी QR कोड स्कॅन केला अन्…

शिवसेनेत कोणी राहिलं आहे का?

35 वर्षे मी सात वेळा भाजपामधून निवडून आलोय. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचं काम मी करत नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे. सुधाकर बडगुजर काय बोलतात, शिवसेनेत कोणी राहिलं आहे का? संजय राऊतसारखा माणूस असताना दुसऱ्या माणसाची गरज नाही. तर खडसे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

कॉलेजचे प्रेम पुन्हा फुललं ! पत्नीचा घात केला अन् दीड तास पाहत राहिला

विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप

धारावी पूनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. नियमबाह्य काम केलं जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. स्वतः उद्धव ठाकरे. यांनी काही केले नाही विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. सरकारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. ते समोर आलंय, हे योग्य नाही. ज्या महिला परत पैसे करतील, त्यांच्यावर नाही. पण ज्या महिला पैसे परत करणार नाही, त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे.

 

follow us