मीच काय 10 ते 12 जण नाराज; ठाकरेंच्या बड्या नेत्याची जाहीर कबुली; मोठा राजकीय खेळ होणार….

मीच काय 10 ते 12 जण नाराज; ठाकरेंच्या बड्या नेत्याची जाहीर कबुली; मोठा राजकीय खेळ होणार….

Sudhakar Badgujar On Changes in Thackeray Group Nashik : शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री असताना त्यांची भेटली. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) देखील शहरात उपस्थित होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यावर बोलताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय की, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहरातले प्रश्न स्थानिक पातळीला सुटले नाही तर मुख्यमंत्र्‍यांपर्यंत ते पोहोच करावे लागतात. ती जबाबदारी काल मी पार पाडली. नाशिक म्युनिसीपल कामगार समितीचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आहेत.

सिंहस्थ कुंभेमळा येऊन ठेपलेला आहे. त्याचं नियोजन व्हावं. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर ताणतणाव येऊ नये. या भावनेने मी काल मुख्यमंत्र्‍यांना भेटलो. ती वस्तुस्थिती त्यांना सांगितली, असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.

भारीच! देशातील तब्बल 6 कोटी शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; यूपी अन् महाराष्ट्राची आघाडी

पक्षाअंतर्गत नाराजी

तर सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. ते भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर बडगुजर यांनी म्हटलंय की, मीच नाही. कमीत कमी संघटनेतील (Shiv Sena) दहा-बारा लोकं नाराज आहेत. संघटानात्मक बदल झाल्यापासून ते अस्वस्थता आहेत. हे वरिष्ठांच्या कानावर ते मी वेळोवेळी घातले आहे. यात सुधारणा करावी, अशी मागणी देखील केली आहे. परंतु नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

संघटनात्मक बदल

राऊत साहेब कुटुंबातील आहे, त्यांच्याबद्दल नाराजीचा विषय नाही. संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेणे गरजेचे होते, ते घेतले नसल्यामुळे नाराजी आहे. विलास शिंदे अनेक दिवसांपासून नाराज आहे. वरिष्ठ पद न मिळाल्यामुळे ते पक्षात अस्वस्थ आहेत. परंतु त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. राजेभाऊ वाजे जेव्हा उभे राहिले, आम्ही त्यांना निवडून आणलं. विरोधकांचं जोरदार वारं सुटलेलं असताना देखील संघटनेला यश मिळालं.

एलॉन मस्क ‘मेक इन इंडिया’मध्ये इंट्रस्टेड नाही, केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

या काळात अपेक्षित पद मिळालं नाही, त्यामुळे विलास शिंदे नाराज आहेत. तर माझी नाराजी कोणावरच नाही, मी स्वत: नाराज आहे. पक्ष सोडून जाण्याची स्पष्ट भूमिका अजून कोणत्याही शिवसैनिकाने घेतलेली दिसत नाही, परंतु येणारा काळच सांगेल काय असेल ते…असंही सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube