Minister Jayakumar Gore threatens social activist : गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दिल्या, या कारणावरून पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर आता मंत्री जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यास धमकी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागातील वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, बनगरवाडी, देवापूर, शिरताव, पळसावडे या गावांना तारळी जलसिंचन योजनेतून पाणी मिळावे, यासाठी शेतकरीवर्ग बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जनावरांसह अर्ध नग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत, अशा बाबतचे निवेदन 21 एप्रिल 2025 रोजी दिलेले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये कोयनानगर जि. सातारा येथे झाली होती.
साखर कारखाना घोटाळा…मंत्री राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
त्यानुसार वर नमूद गावांना दिनांक 15 मार्च पासून पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याचे माननीय मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी जाहीर केले होते. परंतु 15 मार्च 2025 ला आम्हाला पाणी आलं नाही. तदनंतर पाटबंधारे विभागाने 8 एप्रिल 2025 ते 8 मे 2025 या कालावधीत नमूद गावांना पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत प्रसिद्ध केले आहे. परंतु प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळत नसल्याने आमच्या भागातील जनावरांसह पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची बिकट अवस्था झालेली आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या गावातील मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते असणारे जवाहर काळेल व बाबा काळेल सावकार हे माझ्या घरी आले व मला घरातून बाहेर बोलावून माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणून बाबा काळेल सावकार यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला फोन लावून माझ्याकडे दिला.
ट्राय सीरिजमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव
समोरून ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे फोनवर माझ्यासोबत बोलत होते. त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ते म्हणाले माझ्या विरोधात आंदोलन करतोय, तुझा काय संबंध? तू कोण? तू आंदोलनच कर मग तुला दाखवतो, तुझं बिल खूप झालंय, तुझी अवस्था तुषार खरात सारखी करेन, तू लई मोठा पुढारी झालाय का? तुझा ‘आका’ कोण आहे हे मला माहित आहे. ज्याला तू मत दिलंय त्याला जाऊन पाणी माग, अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मला धमकावले आहे.