ट्राय सीरिजमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव

ट्राय सीरिजमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव

India Women vs South Africa Women :  श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सीरिजमध्ये भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa Women) 15 धवांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताकडून प्रतीका रावलने (Pratika Rawal) सर्वाधिक 78 धावा केल्या तर स्नेहा राणाने (Sneha Rana) 5 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर नेले. भारताने या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 50 षटकांत 276 धावा केल्या. भारताकडून प्रतिका रावलने 78 धावा केल्या तर स्मृती मानधनाने 36 धावा केल्या. हरलीन देओलने 29 धावा केल्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 41 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसरीकडे 277 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने शानदार सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 140 धावा जोडल्या. यात लॉरा वुलफार्टने 43 धावा केल्या आणि सलामीवीर ताजमिन ब्रिट्सने 109 धावा करत शतक ठोकले मात्र यानंतर भारतीय महिला संघाने या सामन्यात पुनरागमन करत  दक्षिण आफ्रिकेचा डाव 261 धावांवर गुंडाळला. स्नेहा राणाने ताजमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, क्लो ट्रायॉन, अ‍ॅनेरिके डेरकसेन आणि नादायन क्लास यांना बाद करुन आफ्रिकेला बॅकफूटवर नेले.

स्नेहा राणा या सामन्यात सामनावीर ठरली. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 9 विकेट्सने पराभव केला होता. या मालिकेत भारताचा तिसरा सामना रविवारी 4 मे रोजी श्रीलंकाविरोधात होणार आहे.

पाकिस्तानात ‘दहशत’ , PM मोदींचे सैन्याला आदेश; अडीच तास बैठकीत नेमकं घडलं काय?

प्रतिका रावलचा विक्रम

तर दुसरीकडे या सामन्यात प्रतिका रावलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. प्रतिका रावल एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 500 धावा करणारी खेळाडू ठरली. प्रतिकाने फक्त 8 डावात 500 धावा पूर्ण केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube