भारतीय महिला संघाचा ‘डबल धमाका’ सर्वोच्च धावसंख्या करत मिळावला सर्वात मोठा विजय

  • Written By: Published:
भारतीय महिला संघाचा ‘डबल धमाका’ सर्वोच्च धावसंख्या करत मिळावला सर्वात मोठा विजय

Ind-W Vs Ire-W : भारतीय महिला संघाने आज राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा 304 धावांनी (Ind-W Vs Ire-W) पराभव महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा विजय मिळावला. याआधी भारतीय महिला संघाने 2017 मध्ये आयर्लंडला 249 धावांनी पराभव करत सर्वात मोठा एकदिवसीय विजय नोंदवला होता.

तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतिका रावल (Pratika Rawal) यांनी झळकावलेल्या शतकांमुळे भारताने आयर्लंडविरुद्ध सामन्यात 5 बाद 435 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात आयर्लंडचा संपूर्ण संघ 31.4 षटकांत फक्त 131 धावांवर सर्वबाद झाला. महिला एकदिवसीय सामन्यात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानचा 408 धावांनी पराभव केला होता.

तिसऱ्या सामन्यात भारताच्या 435 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड महिला संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयर्लंडने 24 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या मात्र त्यानंतर सारा फोर्ब्स आणि ओर्ला प्रेंडरगास्ट यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. तर 32 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीप्ती शर्माने फ्रेया सार्जंटला बाद करून आयर्लंडचा डाव 131 धावांवर संपवला. भारताकडून दीप्ती शर्माने 27 धावा देत तीन विकेट्स घेतल्या तर तनुजा कंवरने दोन विकेट घेतल्या आणि तितस साधू, सायली सातघरे आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतला.

तर दुसरीकडे या सामन्यात कर्णधार स्मृतीने फक्त 135 धावा केल्या, जे तिचे 10 वे एकदिवसीय शतक होते. अशाप्रकारे, भारतीय महिला संघ पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. यासह, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह एलिट यादीत सामील झाला. महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. या शानदार खेळीसह स्मृतीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरमनप्रीत कौरच्या 87 चेंडूत झळकलेल्या शतकालाही मागे टाकले.

स्मृतीने 39 चेंडूत तिचे 31 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून प्रतिका रावल आणि कर्णधार स्मृती मानधना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी करत धमाकेदार सुरुवात केली. मानधनाने 80 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांसह 135 धावा केल्या. यानंतर, रिचा घोष फलंदाजीला आली आणि तिने प्रतिका रावलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली.

सुनीता विल्यम्स करणार चमत्कार, 12 वर्षांनंतर अंतराळात होणार ‘स्पेसवॉक’! 

39 व्या षटकात आर्लीन केलीने रिचा घोषला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रिचा घोषने 42 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या प्रतिका रावलला 44 व्या षटकात फ्रेया सार्जंटच्या गोलंदाजीवर डेम्पसीने झेलबाद केले. प्रतिका रावलने 129 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकारासह 154 धावा केल्या. तेजल हसबनीस (28) आणि हरलीन देओल (15) बाद झाल्या. दीप्ती शर्मा (11) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (4) नाबाद राहिल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube