मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक

मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक

Tushar Kharat arrested For News against Minister Jayakumar Gore : मंत्रीमहोदयांच्या विरोधात बातम्या (Journalist) दाखवल्या म्हणून पत्रकारांवर कारवाई होणं, ही गोष्ट नवीन नाहीये. याआधीच्या सरकारमध्ये सुद्धा अशा अनेक कारवाया झाल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात देखील अशीच घटना समोर आलीय. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Minister Jayakumar Gore) यांच्याविरोधात बातम्या दाखवल्या म्हणून, ‘लय भारी’ नावाच्या युट्युब चॅनलच्या पत्रकारावर (Tushar Kharat) कारवाई करण्यात आलीय.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दिल्या, या कारणावरून पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक सुद्धा करण्यात आलीय. मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात जवळपास 85 अधिक बातम्या दाखवल्या, तसंच न्यायालयीन अवमान केला, असा ठपका ठेवत पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना मुंबईतून वडूज पोलिसांनी रात्री उशिरा अटक केलीय. पत्रकार तुषार खरात यांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात वारंवार आवाज उठवला होता. यासोबतच त्यांनी गोरेंविरोधात युट्यूब चॅलनवर अनेक व्हिडिओ देखील केले होते. ही माहिती मंत्री गोरे यांनी अधिवेशनात माध्यमांसोबत बोलताना दिली होती. त्यावेळी तुषार खरात तेथे उपस्थित होते. यावेळी खरातांनी गोरेंना प्रतिप्रश्न देखील केले होते.

आता जेजुरी देवस्थानातही ड्रेस कोड! फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट पेहराव करणाऱ्यांना मज्जाव…

मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर 5 कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तुषार खरात हे मतदार संघातील रहिवासी आहेत. ते माण तालुक्यात अन मुंबईमधून वार्तांकन करत असतात. तसेच सोशल मीडियावर लय भारी न्यूज चॅनेल आणि त्याच नावाचं फेसबुक अकाऊंट चालवतात.

तर पत्रकार तुषार खरात यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात विरोधी पक्षाचे नेते आवाज उठवताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तुषार खरात यांची बाजू लावून धरली आहे. तसंच पत्रकार परिषद घेत रोहित पवार म्हणाले की, तुषार खरात हा तुमच्यातलाच एक पत्रकार आहे. त्यांचा एक छोटा चॅनल आहे. पण पत्रकार हा पत्रकार असतो, खरात यांनी एका राजकीय नेत्याविरोधात मागील वर्षापासून आवाज उठवलाय. एका महिलेची बाजू त्यांनी लावून धरलीय. करोनाच्या काळात
बोगस बिलं केल्याचं प्रकरण समोर आणलं. मृत व्यक्तींच्या नावाने योजनेचे बिलं फुकटात काढून भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आणलं. धनगर समाजाच्या जमिनी हपडल्या. त्याविरोधात आवाज उठवणारा तुषार खरात ओबीसीची समाजाचा एक पत्रकार आहे. तुम्ही देखील त्याच्या सोबत राहावं, असं आवाहन रोहित पवार यांनी माध्यमांना केलंय.

आयुष्मानला चढला चॅम्पियन्स ट्रॉफी फिवर भारताच्या ऐतिहासिक विजयासाठी लिहिली सुंदर कविता!

काल सुद्धा मंत्र्यांविरोधात आवाज उठला म्हणून गुन्हा दाखल झालाय. संतोष देशमुखांची हत्या असेल, जालन्यात एका चिमकुल्यावर झालेल्या अत्याचार असेल अशा प्रकरणात काही होत नाही. परंतु मंत्र्याविरोधात बोललं की, गुन्हा दाखल होतोय. राजकीय व्यक्तींच्या विरोधात बोललं म्हणून एखाद्याला उचलायचं अन् जेलमध्ये टाकायचं, खरातने मांडलेले मु्द्दे सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत, ओबीसींसाठी खरात यांनी ओबींसीसाठी आवाज उठवला. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.

तर तुषार खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. आता या प्रकरणात पुढे काय होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube