Minister Nitesh Rane will come to Holi at Madhi : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) पाथर्डीतील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेत बंदीचा ठराव गाजतो आहे. या ठरावाविरोधात तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी मात्र ठरावावर (Holi at Madhi) भूमिका कायम ठेवली आहे. ठराव कायदेशीर आणि बरोबर आहे. हा ठराव ग्रामपंचायतीच नसून ग्रामसभेने घेतला असल्याचे मरकड यांनी स्पष्ट केले. तसेच आता मढीची होळी पेटवण्यासाठी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे येणार असल्याचे देखील मरकड यांनी यावेळी सांगितले.
पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा मढी ग्रामपंचायतीचा ठराव राज्यासह देशात गाजत आहे. या ठरावाला राजकीय पाठिंबा मिळवा, यासाठी मढी ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. भाजप मंत्री नीतेश राणे यांना यासाठी संपर्क केल्याचे समजते. मंत्री राणे शुक्रवारी (ता. 28) मढीत येणार आहे. यात्रोत्सवानिमित्ताने त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटवली जाणार आहे.
ग्रामसभेची मागणी करणारी दिवंडी दिली जाते, ती मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून केली जाते. हा ग्रामपंचायतीच्या बैठकीतला ठराव नाही, तर ग्रामसभेचा ठराव आहे. ग्रामसभेत नागरिकांच्या सूचनेवर निर्णय घेतला जातो. हात वर करून मतदान केलं जातं. अशाच प्रकारे हा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलाय, असं गावचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितलंय.
” गुंडांना पोलीस ठाण्यात बसवायची नाटक; शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतल्या निर्भया कांडसारखाच ”
बळजबरीने त्यांनी त्या जागा बळकावल्या आहेत. निर्णय घेण्याची वेळ आली कारण, दिवाळीच्या वेळी एक क्लिप फिरत होती. कानिफनाथच्या जागेवर वक्फ बोर्डाची मालकी. मढीमध्ये आजही सातबारा कान्होबाच्या नावाने निघतोय. त्यामुळे आज आम्हाला हा निर्णय घेण्याची वेळ आलीय. राणे साहेब 28 तारखेला सहा वाजता होळी पेटवण्यासाठी ते मढीमध्ये येणार आहेत. त्यांच्या हाताने कानिफनाथाची आरती होणार आहे, असं मढीच्या सरपंचांनी सांगितलंय.