‘जीव जळतोय…’ उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या कृतीचं समर्थन, ऑडिओ क्लिप…

‘जीव जळतोय…’ उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या कृतीचं समर्थन, ऑडिओ क्लिप…

Uddhav Thackeray Call To Vasant More : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) स्वारगेट येथील बस आगारात धाव घेतली. त्यांनी तिथे जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची सुद्धा तोडफोड केलीय. स्वारगेट स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक गंभीर प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता….

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

या प्रकरणानंतर (Swaragate ST Stand) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. वसंत मोरे यांच्या या कृतीचं समर्थन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यांनी मोरेंच तोंडभरून कौतुक केलंय. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. याच संदर्भात वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाषण समोर आलंय.

वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंचा कॉल

वसंत मोरे बोलत आहेत. चांगलं केलंत, जोरात केलंत असं उद्धव ठाकरे वसंत मोरेंना म्हणाले. यावर मोरे म्हणाले की, आम्ही दोघे-तिघेच होतो. म्हटलं मग बाकीचं कोणी येवू नाही तर नाही येवो. साहेब एसटीमध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार (Maharashtra Politics) होता. स्थानकात एसटी बंद पडल्या आहेत. या एसटींचं अक्षरश: लॉजिंग केलंय. या एसटीमध्ये जाणारी सर्व माणसं सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरूनच जातात.

जिथं तिथं ओंगाळवाणा प्रचार! त्या मुलीबद्दल संवेदना तरी व्यक्त करा; स्वारगेटच्या घटनेवरून विश्वभंर चौधरींनी टोचले कान

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, म्हणून आपण जे काही लढत आहोत ना, सगळ्यांना तेच सांगायचा प्रयत्न करतोय. जिव जळतोय. मुंबईत सुद्धा मराठी माणसावर आक्रमण होतंय. तुम्ही जे करत आहात, ते चांगलं आहे. सगळ्यांना धन्यवाद सांगा असं ते वसंत मोरे यांना म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली गेल्याचं समोर आलंय. तर पुण्यात मात्र संतापाचं वातावरण कायम आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube