जिथं तिथं ओंगाळवाणा प्रचार! त्या मुलीबद्दल संवेदना तरी व्यक्त करा; स्वारगेटच्या घटनेवरून विश्वभंर चौधरींनी टोचले कान

Vishwambhar Choudhari on Chitra Wagh for Swarget Crime : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यात कारवाई केल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वाघ आणि भाजपचे कान टोचले आहेत.
घटना नेमकी की काय?
पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले.
AFG vs ENG : रोमांचक सामन्यात इंग्लंडला धक्का, अफगाणिस्तानने मारली बाजी
यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन PM मोदींनी 13 कोटी मराठी जनतेला आनंद दिला; अजित पवार
यावर तात्काळ कारवाई केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्या म्हणाल्या की, पुण्यात बसमध्ये नेऊन अत्याचार झालेल्या भयंकर घटनेत आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मोठी धडक कारवाई केली आहे….! स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षारक्षकांचे तत्काळ निलंबन करण्यात आले असून उद्यापासून नवीन सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करण्याचे आदेश देण्यात आले आहे…! आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या या ठोस निर्णयाबद्दल त्यांची मनापासून आभारी आहे…
स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
या घटनेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांना संपर्क केला असता त्यांनी ST मधील महिला सुरक्षेच्या अनुषंगाने तातडीची बैठक उद्या मंत्रालयात आयोजित केली असल्याची माहिती मिळाली. तसेच फक्त पुणे नाही तर राज्यभरातील ST डेपो ची ही झाडाझडती घेतली जाणार असल्याची माहीती परिवहन मंत्र्यांनी दिली … महायुती सरकारची महिला सुरक्षा पहिली प्राथमिकता असून माता-भगिनींच्या सुरक्षेबाबत कसलीही तोडजोड मुख्यमंत्री देवाभाऊ कधीच करत नाही…!
त्यावरून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वाघ आणि भाजपचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की, जिथं तिथं ओंगाळवाणा प्रचार! 24 तास फक्त प्रचार मोडवर! आधी त्या दुर्दैवी मुलीबद्दल संवेदना तर व्यक्त करा! पहिल्या वाक्यापासून प्रचार करण्याची आवश्यकता आहे का? आणि असे निर्णय घेणं मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्याचं कर्तव्य आहे, उपकार केल्यासारखा प्रचार कशाला? तसेच आज स्वारगेट स्थानकात ती घटना घडली अशाच प्रकारांबाबत तीन दिवसांपूर्वी एसटीच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांना कळवूनही पोलीसांनी काहीही केलं नाही. ही आहे तुमच्या सरकारची कार्यतत्परता! असं म्हणत चौधरी यांनी भाजप आणि सरकारवर टीका केली आहे.