AFG vs ENG : रोमांचक सामन्यात इंग्लंडला धक्का, अफगाणिस्तानने मारली बाजी

  • Written By: Published:
AFG vs ENG : रोमांचक सामन्यात इंग्लंडला धक्का, अफगाणिस्तानने मारली बाजी

AFG vs ENG : लाहोर येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला धक्का देत पराभव केला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  या पराभवामुळे इंग्लंडचा प्रवास चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये संपला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गोलंदाजीत अझमतुल्लाह उमरझाईने कहर केला आणि 5 विकेट घेतले. अफगाणिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 325 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 177 धावा केल्या.

इब्राहिम झद्रानच्या 177 (146) धावांच्या धमाकेदार खेळीमुळे संघाला 3 बाद 37 अशा धावसंख्येतून सावरण्यास मदत झाली. झद्रानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या अफगाणिस्तानसाठी पहिले शतक तर केलेच, पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा बेन डकेटचा विक्रमही मोडला. याच मैदानावर डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी खेळली होती. काही दिवसांतच डकेटचा विक्रम झद्रानने त्याच्याच संघाविरुद्ध मोडला.

तर दुसरीकडे 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली . फिल सॉल्ट फक्त 12 धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जेमी स्मिथ फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 9 धावा काढून मोहम्मद नबीचा बळी ठरला. तर ब्रूक देखील 21 चेंडूत 25 धावा काढून बाद झाला यानंतर जो रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. 38 धावा काढल्यानंतर बटलरने चुकीच्या वेळी त्याची विकेट दिली. यानंतर रूटसोबत जेमी ओव्हरटन आला आणि दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन PM मोदींनी 13 कोटी मराठी जनतेला आनंद दिला; अजित पवार

रूटने शानदार फलंदाजी केली आणि जवळजवळ पाच वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले.रूटने 111 चेंडूत 120 धावांची शानदार खेळी केली.  मात्र रूट इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि 45 व्या षटकात तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 48 व्या षटकात ओव्हरटन बाद झाल्याने इंग्लिश संघाच्या आशाही संपुष्टात आल्या. संपूर्ण इंग्लंड संघ 317 धावा करून सर्वबाद झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या