Dhananjay Munde and Yogesh Kadam meet : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सेवा देण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. प्रामाणिकता, पारदर्शकता आणि अकाउंटिबीलिटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून (Yogesh Kadam ) विभागात चांगले करावे, सर्व सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगन्याशी या विभागाचा संबंध आहे त्यामुळे अधिक पारदर्शकपणे आणि जास्त जबाबदारीने काम करावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.
Dhananjay Munde : मुंडे भावा-बहिणीच्या प्रेमाला आले भरते | LetsUpp Marathi
तसेच स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही धनंजय मुंडेंनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज मंत्री मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याचे राज्यमंत्री असलेले योगेश कदम यांना शुभेच्छा दिल्या. योगेश कदम यांनी मुंडे यांच्या निवास्थानी जात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी कदम आणि मुंडे कुटुंबातील आठवणीही यानिमात्ताने सांगितल्या आहेत. त्यांनी या भेटीनंतर ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी या आठवणी त्याज्या केल्या आहेत.
काय आहे ट्वीटमध्ये?
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री असताना रामदास भाई कदम साहेब हे त्याच खात्याचे राज्यमंत्री होते, आज माझ्याकडे ज्या विभागाचा कार्यभार आहे त्याच खात्याचे राज्यमंत्रीपद योगायोगाने योगेश यांना मिळाल्याने मुंडे आणि कदम कुटुंबातील हे नाते दुसऱ्या पिढीपर्यंत ही चालत आले आहे. या निमित्ताने विभागाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री श्री. योगेश रामदास कदम यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री असताना श्री. रामदास भाई कदम साहेब हे त्याच खात्याचे राज्यमंत्री होते, आज माझ्याकडे ज्या… pic.twitter.com/f5M1vBzMRm
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 27, 2024