गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेनं बहुमत दिलं का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
Vijay Wadettiwar Criticize Fadnavis Government On Beed Parbhani Violence : राज्यात महायुती सरकारचे (Mahayuti Goverment) बहुमतात सरकार आलं. हे सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळालं का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय.
…तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट नमूद (Beed Parbhani Violence) आहे. त्यामुळे पोलिसांनी कस्टडीमध्ये असताना सुर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप
या प्रकरणी पोलिसांवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. बीडमध्ये देखील एक गुंड सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देतो, त्यांचा जीव जाईल इतकी मारहाण होते. सरपंचाचे डोळे जाळले गेले, इतके होईपर्यंत पोलीस गुंड विरोधात कारवाई करत नाही. हा गुंड एका मंत्र्यांच्या विश्वासू आहेत, त्यामुळे त्यांना संरक्षण दिले जाते का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता,पण हा प्रस्ताव देखील विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.
स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक या प्रश्नांवर चर्चा मागत होते पण हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांचा आवाज दाबला गेला अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. म्हणूनच आज काँग्रेसने सभात्याग केला. आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. महायुती सरकारचा निषेध करत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की, यासाठी सरकारला बहुमत तुम्हाला मिळाले आहे का? परभणी आणि बीड प्रकरणी विरोधक घटनास्थळी भेट देणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.