मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Mahayuti Cabinet Expansion : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं देखील नाव आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे बहुमत (Mahayuti Cabinet Expansion) आहे. शिंदे अजित पवार आणि फडणवीस असे मिळून त्यांच्याकडे सव्वा दोनशेचा आकडा आहे. महाराष्ट्रातल्या 288 जागांच्या तुलनेत हे बहुमत फार मोठं आहे. त्यामुळे कोणाच्या मनातील किती असंतोष बाहेर पडला, तरी त्या ठिणग्यांनी या ईव्हीएम सरकारला चटके बसतील अशी शक्यता नाही. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळात मनोज जरांगे पाटलांविरोधात छगन भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं. कारण शेवटी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक घटक आहेत.

‘जय हिंद, कोड पाठवा…’ थेट राष्ट्रपतींच्या नावाने मेसेज, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवण्याचा प्रयत्न

ओबीसी, धनगर, मराठा या सर्वांना समान न्याय मिळावा. ही आमची सर्वांची भूमिका असताना भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. भुजबळ साहेबांना ती टोकाची भूमिका घ्यायला लावली. छगन भुजबळ यांचा पुरेपुर वापर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर झाला, असं स्पष्ट दिसत होतं. अन्यथा इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते. ज्यांनी भुजबळांना ही भूमिका घ्यायला लावली, त्यांनी भुजबळांना आता वाऱ्यावर सोडलं, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आज लोकसभेत सादर होणार; भाजप, शिवसेना, काँग्रेस खासदारांना व्हीप जारी

भुजबळांनी कितीही आदळआपट केली तरी त्यांची लढण्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता किती आहे, हे पाहावं लागेल. महाराष्ट्रात जातीय समन्वय, सलोखा राहावा ही आमची आजही भूमिका आहे. तानाजी सावंत नाराज आहेत. बाकी आता लोकं अश्रू ढाळत आहेत, त्यांच्या अश्रूंना कोण विचारतं असं देखील राऊत म्हणाले आहेत. रडतील, रडतील अन् गप्प बसतील असं देखील राऊत म्हणालेत. कारण एखादा दुसरा आमदार नाराज झाल्यास सरकारला तढा जाणार नाही. त्यामुळे त्यांच्या हातात एखादा खुळखुळा दिला जाईल, अन् सर्व शांत होईल अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यातील अनेक भागात तणाव आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. जरांगे विरूद्ध भुजबळ या वादात पडणार नाही. भुजबळांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती. त्या शक्तीने त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. जी अदृश्य महाशक्ती पक्ष फोडण्यासाठी शिंदेंच्या मागे होती, तीच भुजबळांच्या मागे होती असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube