Download App

स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, माणिकराव दिलखुलास पण… विखेंचा कोकाटेंना सल्ला अन् रोहित पवारांना टोला

Minister Radhakrishana Vikhe यांनी रोहित पवार यांनी कोकाटेच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवरून कोकाटेंना सल्ला आणि रेहित पवार यांना टोला लगावला.

Minister Radhakrishana Vikhe on Manikrao Kokate and Rohit Pawar : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दिलखुलास माणूस असून मनमोकळे बोलतात. आपण सार्वजनिक जीवनात असताना आपलं मन जरी साफ असलं मात्र आपण ज्या पदावर आहोत आपण मर्यादित बोललो पाहिजे. आपण उत्साहात जे काही बोलतो याला आवर घातला पाहिजे असा सल्ला आपण कोकाटे यांना दिला असे यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

लोकसभेचं कामकाज संपलं अन् महाराष्ट्राच्या वाघिणींनी घेतला आपटून-आपटून मारणाऱ्या दुबेंचा समाचार

ऑनलाइन पत्ते खेळण्याच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामेची मागणी होत आहे या वरती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर देखील झालेल्या आरोपांवरती विखेंनी भाष्य केले तसेच यावेळी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्या वरती भाष्य करत त्यांना खोचक टोला देखील लागावला.

ब्रेकिंग : मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील 12 आरोपींच्या निर्दोष सुटकेला SC ची स्थगिती

सल्ले देण्यापेक्षा स्वतःचे पक्षाकडे लक्ष द्या विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभा विधानसभेतील सभागृहांमध्ये एक ऑनलाईन पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनामे बाबत आक्रमक झाले यावरती बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की रोहित पवार यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा इतरांना सल्ला देण्यापेक्षा. तसेच माणिकराव कोकाटे यांनी देखील त्या प्रकरणाबाबत स्वतः भाष्य केलेले आहे.

दीड कोटींच्या खंडणीचा फटका! अहिल्यानगर LCB मध्ये खांदेपालट; आहेर यांची बदली, नवे पोलीस निरीक्षक कोण?

विरोधकांकडे कोणत्याही अजेंडा नाही

पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले गेले या प्रश्नावरती बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले विरोधकांकडे कोणताही अजेंडा राहिलेला नाही त्यामुळे सरकारचं जे यश आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करणे तसेच आरोप प्रत्यारोप करणे जनतेचे लक्ष विकसित कामांकडून दुसरीकडे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही अशा शब्दांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला.

एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…! लोढासोबत फोटो पोस्ट करत महाजनांचा पलटवार

राजीनाम्याची मागणी चुकीची…मंत्री कदमांच्या मदतीसाठी विखे सरसावले

अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर जे काही आरोप केलेले आहेत या वरती कदम यांनी खुलासे केलेले आहेत. यावरती कायदेशीर कारवाई करण्याबाबत देखील कदम यांनी भाष्य केलेले आहे त्यामुळे या गोष्टीची सखोल चौकशी होणे गरजेचे असून चौकशी अंतिम निकाल येईल त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल मात्र केवळ कोणालातरी आरोपी ठरवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे योग्य नाही अशा शब्दातच एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी योगेश परब यांची पाठ राखण केली.

follow us