Uday Samant On Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. यानंतर काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे कळते आहे. यावरुन आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे आता अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्या चर्चांवर शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सगळ्या चर्चा सगळ्या निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
किसान सभेचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यामुळे ते आपल्या गावी जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर सामंतांनी बोलताना ते आपल्या गावच्या जत्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावच्या जत्रेला गेल्यावरही जर कोणी मुख्यमंत्री नाराज असल्याचे म्हणत असतील तर त्यांचा नागरी सत्कार जत्रेतच केला पाहिजे, असे सामंत म्हणाले आहेत.
‘शिंदे-फडणवीस रागावले’; रवींद्र धंगेकरांनी कारणही सांगून टाकले..
तसेच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार अशी देखील चर्चा सुरु आहे. तसेच ठाकरे गटाचे 13 पैकी 7 आमदार हे आमच्यासोबत येणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे. याचबरोबर काँग्रेसचा मोठा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे जेव्हा या चर्चा प्रत्यक्षात येतील तेव्हा बघू, असे ते म्हणाले आहेत. तसेच पुढील दीड वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील व त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.