मुंबई : राज्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA टेस्टच्या कीट्सचा तुटवडा असून ही आरोपींच्या बचावासाठीच योजना असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) गृह खात्यावर ताशेरे ओढले होते. संजय राऊतांनी यासंदर्भात दखल घेण्याबाबतचं पत्रच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लिहिलं होतं. राऊतांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून (Ministery of Home Affairs) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गृह विभागाकडून मागील वर्षीचा फॉरेन्सिक लॅबमधील संपूर्ण डाटाच सांगण्यात आला आहे.
संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे माहिती संपूर्णपणे खोटी असून फॉरेन्सिक लॅब मुंबईसह एकूण 8 ठिकाणी डीएनए टेस्टिंगची सुविधा उपलब्ध आहे. या लॅबमध्ये सुरळीतपणे काम सुरु असून डीएनए किट्स आणि त्यासाठी लागणारे केमिकल्सला ‘एक्सपायरी डेट’ असते. त्यामुळे त्याचा फार साठा करुन ठेवण्यात येत नाही. सद्यस्थितीत आठही ठिकाणी डीएनए किट्स उपलब्ध असून, आवश्यकतेप्रमाणे आणि मागणीनुसार, त्या नियमितपणे दरपत्रकानुसार खरेदी करण्यात येत असल्याचं गृहखात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला: केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळे यांचा दावा
काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यात घडलेल्या अपघातातील 25 मृत व्यक्तींची डीएनए टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा अहवाल 74 तासांत देण्यात आला असल्याचं गृहविभागाने सांगितलं आहे. तसेच नागपुरात सोलार एक्सप्लोझिव्हमध्ये झालेल्या दुर्घटनेतील 9 कामगारांचा मृत्यू झाला. त्यातील 105 नमुन्यांचे डीएनए अहवाल तत्काळ देण्यात आले होते. डीएनए टेस्टींगचे काम हे लॅबमध्ये नियमितपणे सुरु असून, एकट्या डिसेंबर महिन्यात मुंबईतून 80, नांदेडमधून 75, नागपूर 63, छत्रपती संभाजीनगर 25, अमरावती 25, कोल्हापूर 11 तसेच पुणे प्रयोगशाळेतून 7 प्रकरणातील डीएनए अहवाल देण्यात आले असल्याचं गृहखात्याने स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत पत्रात नेमकं काय म्हटले होते?
“एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधित आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. या प्रयोगशाळेतील DNA चा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, POCSO कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो, परंतु एप्रिल २०२३ पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, अशी माझी माहिती आहे.
Sanskruti Balgude : संस्कृतीच्या निळ्या शिमरी ड्रेमधील हॉट अंदाज, मादक अदा
काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.” असं संजय राऊतांनी पत्राद्वारे म्हटलं होतं.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्याच्या गृहखात्याकडूनही संपूर्ण डाटाच सांगण्यात आला आहे. गृहखात्याच्या स्पष्टीकरणानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरेलं.