मविआ- वंचितची चर्चा फिस्कटल्यात जमा; राऊतांकडून वंचितचा भूतकाळात उल्लेख
Sanjay Raut On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत मविआ-वंचित चर्चा फिसकटल्यात जमा झाल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Politics) संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर राऊतांनी ( Sanjay Raut) सारवासारव केल्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्यांच्या तोंडून माहिती बाहेर पडली होती.
आम्ही प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar), चार जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांची भूमिका वेगळीच आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. संविधान वाचवण्यासाठी या हुकूमशाहीशी लढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नक्कीच गती आणि बळ आले असते. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची माहिती दिली.
काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी आहे. आम्ही राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड येथे जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष राज्यात आपली जागा मागत आहेत, त्यावर त्याचा संघर्ष अवलंबून आहे. त्यांचे अस्तित्व कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. भिवंडी बाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत, असे यावेळी राऊत म्हणाले.
कोल्हापूरची जागा सीटिंग आहे, आम्ही ते हसत हसत सोडली आम्हाला यातना झाल्या आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहेत आपण सांगलीची जागा लढवू. आज सकाळीच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली, त्यानंतर उद्धव ठाकरे, मी आणि आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना होऊ. श्रीमंत शाहू महाराज यांना भेटू, त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा आम्हाला असावी. आम्ही नक्कीच त्या जागेवरती ठाम आहोत. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही कोल्हापूरची महत्त्वाची जागा महाविकास आघाडीला दिलेली आहे. राजू शेट्टी यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एखादी जागा असावी आणि ती ताकदीने लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने काही चुकीचे आहे, मला वाटत नाही.
पुढे म्हणाले की, पंतप्रधान आमचे भाषण चांगल्या पद्धतीने ऐकत आहेत. आमची देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची डिक्शनरी आहे. त्यांची स्वार्थाची डिक्शनरी आहे. कोण बोलत गरीब आशीर्वाद देत आहेत तुम्हाला? या निवडणुकीत कळेल गरीब ईव्हीएमला शिव्या देत आहेत, ईव्हीएमला शिव्या देणे म्हणजे भाजपला शिव्या देणे. औरंगजेबही हेच करत होता. मोदींनी मगरीचे अश्रू काढणे बंद करा, ते काही काळासाठी पंतप्रधान आहेत. त्यांनी त्यांची गरिमा सांभाळावी, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला आहे.