Amol Khatal On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश कत्तलखान्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात गोवंश कत्तलखान्यांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. तर या प्रकरणात लेट्सअप मराठीशी (LetsUpp Marathi) बोलताना त्यांनी काॅंग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधत संगमनेर (Sangamner) तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून राजकीय आशीर्वादाने गोवंश कत्तखाने सुरु होते असा आरोप केला आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) म्हणाले की, संगमनेर शहरात आणि तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून गोवंश हत्या होत होती. मात्र मी आमदार होताच वेळोवेळी पोलीस प्रशासनाला आणि नगर पालिकेला सूचना देऊन अनेक कत्तलखाने उद्धवस्त केले मात्र तरी देखील पुणे, मुंबई सारख्या शहरात संगमनेरवरुन गोमांस जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याने या अधिवेशानात मी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात आतापर्यंत किती कारवाया झाल्या, कोणावर एमपीडीअंतर्गत कारवाई करण्यात आली अशी माहिती मागितली होती. मात्र संगमनेर पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती दिली आहे.
पोलिसांनी एकावर एमपीडीअंतर्गत कारवाई झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे मात्र आतापर्यंत कोणावर देखील एमपीडीअंतर्गत कारवाई झाली नसल्याची माहिती आमदार खताळ यांनी लेट्सअप मराठीला दिली. पोलीस सरकारला खोटी माहिती देऊन गोवंश हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने स्थानिक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्याचा निलंबन करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. असं आमदार अमोल खताळ म्हणाले.
वारीत तलवार चालते पण संविधानावर आक्षेप; आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल
तसेच काही भ्रष्ट अधिकारी यांच्या मदतीने यापूर्वी संगमनेरमध्ये दिवस- रात्र कत्तलखाने सुरु होते पण आता आम्ही कंट्रोल करत आहे पण जर या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली तर संगमनेर तालुक्यात कत्तलखाने बंद होऊ शकतात मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे असेही आमदार अमोल खताळ म्हणाले.